धर्मनिरपेक्षता / सेक्युलरिझम
व्याज-धर्मनिरपेक्षता आणि खरी धर्मनिरपेक्षता असा भेद करणे म्हणजे बौद्धिक अप्रामाणिकपणा होय. सेक्युलरिझम ही संज्ञा ख्रिश्चन परंपरेमधून उगम पावली आहे. ईश्वराला देय असेल ते त्याला दे व राजाला देय असेल ते राजाला दे असा बायबलमध्ये मानवाला उपदेश आहे. त्यामुळे मानवी जीवन हितावह ठरते. भारतीय परंपरेत अशी संज्ञा आढळत नाही. ईश्वरी क्षेत्र आणि मानवी क्षेत्र स्वायत्त आहेत …